support@dailyagronews.com      +91-8484924178

राज्‍यात संत्रा ५०० ते ४००० रुपये प्रतिक्विंटल

राज्‍यात संत्रा ५०० ते ४००० रुपये प्रतिक्विंटल
By: Agro_market Posted On: March 19, 2020 View: 7

राज्‍यात संत्रा ५०० ते ४००० रुपये प्रतिक्विंटल

औरंगाबादमध्ये प्रतिक्विंटल ६०० ते १६०० रुपये दर

औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता.१९) संत्र्यांची १४० क्‍विंटल आवक झाली. त्यांना किमान ६०० ते कमाल १६०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. 

औरंगाबाद बाजार समितीमध्ये ११ मार्चला ७८ क्‍विंटल संत्र्यांची आवक झाली. त्यांना किमान ७०० ते कमाल १५०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. १२ मार्चला १३० क्‍विंटल आवक झालेल्या संत्र्यांचे दर १००० ते १६०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. १४ मार्चला ११२ क्‍विंटल आवक झालेल्या संत्र्यांचे दर ६०० ते १५०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. १५ मार्चला ११२ क्‍विंटल आवक झाली. त्या वेळी संत्र्यांना ८०० ते १२०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला.

१६ मार्च रोजी संत्र्यांची आवक १३३ क्‍विंटल, तर दर किमान ६०० ते कमाल १६०० रुपये प्रतिक्‍विंटल मिळाला. १७ मार्चला ७३ क्‍विंटल आवक झालेल्या संत्र्यांना १००० ते ३५०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. १८ मार्च रोजी ३९ क्‍विंटल आवक झालेल्या संत्र्यांना ७०० ते २००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला.

जळगावात १८०० ते २४०० रुपये दर

जळगाव  ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता. १९) १७ क्विंटल संत्र्याची आवक झाली. त्यांना दर प्रतिक्विंटल किमान १८०० ते कमाल २४०० रुपये असा मिळाला. आवक पाचोरा, जामनेर, औरंगाबादमधील सोयगाव, सिल्लोड, चाळीसगाव भागांतून होत आहे. आवक स्थिर असून दरही टिकून आहेत, अशी माहिती मिळाली. 

अकोल्यात १००० ते ४००० रुपये

अकोला  ः सध्या ढगाळ वातावरणामुळे संत्रा बागायतदार चिंतेत पडलेले आहेत. वादळामुळे बागांचेही नुकसान झाले. अशातच बाजारपेठेत संत्र्यांच्या २० किलोच्या प्रतिक्रेटला किमान २०० ते ८०० रुपयांपर्यंत दर मिळत आहेत. म्हणजेच प्रतिक्विंटल १००० ते ४००० रुपये दर आहेत.

अकोला बाजारपेठेत विविध भागांतून संत्र्यांची आवक होत असते. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे संत्र्याच्या मागणीत सुधारणा झाली असल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात आले. 

दुय्यम दर्जाचा संत्रा २०० ते ४०० प्रतिक्रेटने विकत आहेत. तर उत्कृष्ट दर्जाचा संत्रा ४०० ते ८०० रुपयांदरम्यान विकत आहे. ८०० रुपयांचा दर अत्यंत कमी मालाला मिळत असल्याचेही व्यापाऱ्यांनी सांगितले. 

सध्या दररोज तीन ते चार वाहनांची आवक होत आहे. एका क्रेटमध्ये सरासरी २० किलो संत्र्याची फळे सामावतात. किरकोळ बाजारात संत्र्यांची किमान ३० ते कमाल ४० रुपये प्रतिकिलो दराने विक्री केली जात आहे.

नाशिकमध्ये ११०० ते २००० रुपयांचा दर

नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवार (ता.१८) संत्र्यांची ११५ क्विंटल आवक झाली. त्यांना प्रतिक्विंटल किमान ११०० ते कमाल २००० रुपये असा दर मिळाला. सर्वसाधारण दर १८०० रुपये होते, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

मंगळवारी (ता.१७) संत्र्याची आवक १२० क्विंटल झाली. त्यांना किमान ११०० ते कमाल २४०० असा प्रतिक्विंटल दर मिळाला. सर्वसाधारण दर १८०० रुपये होते. सोमवारी (ता.१६) संत्र्यांची आवक १४० क्विंटल झाली. त्यांना १२०० ते २७०० प्रतिक्विंटल दर मिळाला. सर्वसाधारण दर १९०० होता.

रविवारी (ता.१५) फळबाजार बंद होते. त्यामुळे आवक झाली नाही. शनिवारी (ता.१४) संत्र्यांची आवक ३० क्विंटल झाली. त्या वेळी किमान ११०० ते कमाल २५०० असा दर मिळाला. सर्वसाधारण दर १८०० रुपये होता. शुक्रवारी (ता.१३) संत्र्यांची आवक ६० क्विंटल झाली. त्यांना ११०० ते २४०० असा दर मिळाला. सर्वसाधारण दर १७०० रुपये होता. गुरुवारी (ता.१२) संत्र्यांची आवक १२० क्विंटल झाली. त्यांना११०० ते २४०० असा दर मिळाला. सर्वसाधारण दर १७०० होता. 

मागील आठवड्यापासून बाजार समितीत संत्र्याची आवक वाढली आहे. त्यास दरही टिकून आहे. उठाव असल्याने किरकोळ विक्रेत्यांकडून मागणी टिकून आहे, असे फळ व्यापाऱ्यांनी सांगितले.

परभणीत ५०० ते २५०० रुपये

परभणी :  येथील पाथरी रस्त्यावरील फळे-भाजीपाला मार्केटमध्ये गुरुवारी (ता.१९)  संत्र्यांची २०० क्विंटल (१ हजार क्रेट) आवक झाली. त्यांना प्रतिक्विंटलला किमान ५०० ते कमाल २५०० रुपये (प्रतिक्रेट १०० ते ५०० रुपये) दर मिळाले, अशी माहिती मार्केटमधील सूत्रांनी दिली. 

सध्या येथील फळे-भाजीपाला मार्केटमध्ये स्थानिक परिसरातील जांब, मांडाखळी, हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातून संत्र्यांची आवक होत आहे. गेल्या महिनाभरात दररोज सरासरी  १६० ते २०० क्विंटल (८०० ते १००० क्रेट) संत्र्याची आवक होत आहे. गेल्या आठवड्यापर्यंत प्रतिक्विंटलला २५० ते १५००  रुपये (प्रतिक्रेट ५० ते ३०० रुपये) दर होते.

चालू आठवड्यामध्ये संत्र्याची मागणी वाढल्यामुळे दरात सुधारणा झाली आहे. गुरुवारी (ता.१९) संत्र्यांची २०० क्विंटल आवक झाली. त्यांना घाऊक विक्रीचे दर प्रतिक्विंटलला किमान ५०० ते कमाल २५०० रुपये होते. तर, किरकोळ विक्री प्रतिकिलो २० ते ४० रुपये दराने सुरू होती, असे व्यापारी मो. इद्रिस यांनी सांगितले.

पुण्यात क्विंटलला २५०० रुपये दर

पुणे  ः वाढता उन्हाळा आणि कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी ‘क' जीवनसत्त्वाच्या मागणीमुळे संत्र्याला अचानक मोठी मागणी वाढली आहे. परिणामी, गेल्या १५ दिवसांत संत्र्यांचे दर ३० टक्क्यांपर्यंत वाढले आहेत, अशी माहिती पुणे बाजार समितीमधील संत्र्यांचे प्रमुख आडतदार सोनू ढमढेरे यांनी दिली. गुरुवारी (ता.१९) संत्र्यांला टनाचा दर सुमारे २५ हजार रुपयांपर्यंत राहिला. 

बाजार समितीमधील फळ विभागात गुरुवारी (ता.१९) संत्र्यांची सुमारे ७० टन आवक झाली. आवक स्थिर होती. मात्र, मागणी वाढल्याने दरात वाढ झाली होती. बाजार समितीमध्ये तीन डझनाला किमान १०० ते कमाल २५०, तर ४ डझनाला किमान ३० ते कमाल १३० रुपये दर मिळाले. तर, टनाला २० ते २५ हजार रुपये दर मिळाला.

नगरमध्ये ५०० ते ३००० हजार रुपये

नगर : नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवारी (ता. १९) संत्र्यांची २५० क्विंटलची आवक झाली. त्यांना प्रतिक्विंटल किमान ५०० ते कमाल ३००० हजार व सरासरी १७८० रुपयांचा दर मिळला. जिल्ह्यामध्ये संत्र्यांला मागणी वाढली आहे. 

नगर बाजार समितीत नगर तालुक्यासह शेजारच्या जिल्ह्यांतून संत्र्याची आवक होत असते. १० मार्च रोजी १४० क्विंटल संत्र्यांची आवक झाली. त्यांना ५०० ते ३००० आणि सरासरी १७५० रुपयांचा दर मिळाला. ७ मार्च रोजी २४५ क्विंटलची आवक होऊन किमान ५०० ते कमाल २५०० व सरासरी १५०० रुपयांचा दर मिळाला. 

२९ फेब्रुवारी रोजी २१३ क्विंटलची आवक होऊन किमान ५०० ते कमाल ५००० व सरासरी २७५० रुपयांचा दर मिळाला, असे बाजार समितीतून सांगण्यात आले. सध्या नगरसह जिल्हाभरात संत्र्यांना मागणी असल्याचे सांगण्यात आले.

ताज्या बाजार भावासाठी क्लिक करा

  Contact Us
  Dailyagronews.com.

Botawala Chambers , Fort-Mumbai

Tel : + (91) - 8484924178
Mail : support@dailyagronews.com
Business Hours : 9:30 - 5:30

  About

Dailyagronews is a dedicated platform for Exclusive Agriculture News , Now stay in touch with latest happenings in Agriculture . This site is a work of team of technocrafts wanted to help the farming community by contributing something helpful to them. Join this unique platform by contributing the agro news , we will be happy to make it viral