कोरफड लागवडीविषयी माहिती...
[unable to retrieve full-text content]
स्थानिक बाजारपेठेचा अभ्यास करूनच कोरफड लागवडीचा विचार करावा. हे पीक हलक्या, वालुकामय, उत्तम निचऱ्याच्या जमिनीत चांगले येते. लागवडीसाठी योग्य आकाराचे सपाट वाफे किंवा ६५ ते ७५ सें.मी. अंतरावर सरी-वरंबे तयार करावेत.
कोरफडीची अभिवृद्धी मुनव्यांपासून करतात. पावसाळा सुरू होताच लागवड करावी. या पिकास माती परीक्षणानुसार प्रति हेक्टरी २०किलो नत्र, २० किलो स्फुरद आणि २० किलो पालाश ही खतमात्रा द्यावी. पिकाला गरजेनुसार पाणी द्यावे. लागवड केलेल्या वाफ्यात किंवा वरंब्यावर पानांच्या वजनामुळे कोरफड कोलमडू नये म्हणून वेळोवेळी गरजेनुसार मातीचा आधार द्यावा. दोन वर्षांपासून पुढे मांसल पानाचे उत्पादन मिळते. लागवड करण्यापूर्वी तज्ज्ञांचे मार्गदर्शन घ्यावे.
संपर्क : ०२४२६- २४३२९२.
औषधी व सुगंधी वनस्पती योजना, महात्मा फुले कृषी विद्यापीठ , राहुरी, जि. नगर