बांबू लागवड
[unable to retrieve full-text content]
बांबू लागवड करायच्या ठिकाणी उन्हाळ्यात ३ x३ मीटर अंतरावर आखणी करून कंदापासून लागवड करण्यासाठी ६० x ६० x ६० सेंमी आकाराचे खड्डे खोदून ठेवावेत. रोपापासून लागवड करावयाची असल्यास ३० x ३० x ३० सेंमी आकाराचे खड्डे खोदावेत. कंद लागवडीसाठी जर कंदाचा आकार मोठा असेल, तर त्यानुसार खड्ड्याचा आकार वाढवावा.
पावसाळ्याच्या सुरवातीस चांगली माती, २५० ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेटही मातीमध्ये मिसळावे. अशा भरून घेतलेल्या खड्ड्यामध्ये कंद, पॉलिथिन पिशवीत वाढलेली रोपे किंवा गादीवाफ्यावर वाढविलेली रोपे रोपांच्या मुळांना इजा होणार नाही, अशा तऱ्हेने मातीसह काढून लावावीत.
बांबू रोपांची पावसाळ्यात लागवड झाल्यानंतर पहिल्या वर्षी डिसेंबर ते मे महिन्यात लागवडीस पाणी द्यावे. निंदणी व भर देण्याचे काम लागवडीपासून तीन वर्षांपर्यंत करावे.
संपर्क : ०२३५८- २८२७१७
वनशास्त्र महाविद्यालय, दापोली