support@dailyagronews.com      +91-8484924178

भेंडीची तोडणी सूरू, पुरवठाही वाढला..(video सुद्धा)

भेंडीची तोडणी सूरू, पुरवठाही वाढला..(video सुद्धा)
By: Agro_market Posted On: May 22, 2020 View: 11

भेंडीची तोडणी सूरू, पुरवठाही वाढला..(video सुद्धा)

नाशिक : बागायती भागातून वाढलेला पुरवठा आणि पावसाळी वातावरणामुळे नाशिक भागात भेंडीच्या मागणीत किंचित घट झाली आहे. त्यामुळे भावात सुधारणा होत नसल्याची माहिती भेंडी उत्पादक शेतकऱ्यांनी दिली.

भेंडी उत्पादक सोमनाथ नवले म्हणाले की, ४० रुपये किलोने विकली जाणारी भेंडी आता ३० रुपये दराने विकावी लागत आहे. नाशिक मार्केटला आधी मी ४०० रुपये क्रेट (१० ते १२ किलो) माझा पहिला तोडा विकला. मात्र, गेल्या ४-५ दिवसांपासून भाव प्रति क्रेट २५० ते ३०० रुपयांवर आले आहेत.

शेतकऱ्यांकडून भेंडीची तोडणी सुरू...  पहा video

श्री.नवले यांनी ३०० रुपये मोजून १०० ग्रॅम भेंडी बियाणे आणले होते. त्यांनी दोन गुंठ्यात लागवड केली होती. भेंडीचा पुरवठा यापुढेही चांगला राहील. मात्र, भाव फारसे वाढणार नाहीत, असे त्यांचे म्हणणे आहे.

दरम्यान, नाशिक मार्केटमधील व्यापाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, भेंडीचा पुरवठा गुजरात भागातून वाढला आहे. दुसऱ्या बाजूला एरवी मुंबईच्या दिशेने जाणारा माल लॉकडाउनमुळे अडकून पडतो आहे. हा माल देखील स्थानिक बाजारात येत असल्यामुळे भेंडीची आवक वाढून भाव कमी झाले आहेत.
 

  Contact Us
  Dailyagronews.com.

Botawala Chambers , Fort-Mumbai

Tel : + (91) - 8484924178
Mail : support@dailyagronews.com
Business Hours : 9:30 - 5:30

  About

Dailyagronews is a dedicated platform for Exclusive Agriculture News , Now stay in touch with latest happenings in Agriculture . This site is a work of team of technocrafts wanted to help the farming community by contributing something helpful to them. Join this unique platform by contributing the agro news , we will be happy to make it viral