support@dailyagronews.com      +91-8484924178

‘ॲग्रोवन’चे कृषी प्रदर्शन आजपासून

‘ॲग्रोवन’चे कृषी प्रदर्शन आजपासून
By: Agro11 Posted On: January 05, 2018 View: 363

‘ॲग्रोवन’चे कृषी प्रदर्शन आजपासून

सांगली - नेचर केअर फर्टिलायझर प्रस्तुत ‘ॲग्रोवन’ कृषी प्रदर्शनाचे उद्‍घाटन शुक्रवारी (ता. ५) सकाळी अकरा वाजता शेतकऱ्यांच्या हस्ते होणार आहे. त्यासाठी नेमिनाथनगर येथील कल्पद्रूम क्रीडांगणावर जय्यत तयारी झाली आहे. मे. बी. जी. चितळे आणि चितळे जिनस एबीएस इंडिया प्रदर्शनाचे सहप्रायोजक आहेत. आधुनिक शेती करण्यासाठी नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती हमखास मिळण्यासाठी ‘ॲग्रोवन’ कृषी प्रदर्शन सकाळी १० ते ७ या वेळेत शेतकऱ्यांसाठी खुले खुले असणार आहे.

महाराष्ट्राच्या कृषी क्षेत्रात क्रांतिकारी बदल घडवणाऱ्या ‘ॲग्रोवन’ने सतत नावीन्याचा ध्यास धरताना शेतकऱ्यांना सतत एक पाऊल पुढे ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. प्रदर्शनांमधून शेतीचे अत्याधुनिक तंत्रज्ञानाची माहिती मिळात असून, या प्रदर्शनांतून शेतकऱ्यांना प्रेरणा मिळते. नवनवीन तंत्रज्ञान, खते, औषधे, अवजारे, यंत्रसामग्रीचे स्टॉल प्रदर्शनात आहेत. ट्रॅक्‍टर्स, हार्वेस्टिंग यंत्रे, विविध प्रकारची अवजारे, कापणी यंत्रे, जैविक कीटकनाशके, विद्राव्य खते, ग्रीन हाउस टेक्‍नॉलॉजी आणि इप्लिमेंटस्‌, बियाणे उत्पादक, टिश्‍यूकल्चर, ठिबक व तुषार सिंचन, पॅकेजिंग आणि कोल्ड स्टोअरेज उद्योजक, ग्रेडिंग, वेइंग, सॉर्टिंग अवजारे उत्पादक कंपन्या, बॅंका व कृषी शिक्षण संस्था, कृषी साहित्य प्रकाशन, कृषी संशोधन संस्था व शासनाचे विविध विभाग सहभागी झालेत. प्रदर्शनांतून शेतकऱ्यांना नावीन्यपूर्ण तंत्रज्ञान, अवजारांची माहिती एकाच छताखाली उपलब्ध आहे. पशुधनाबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे.

दरम्यान, द्राक्ष, डाळिंब, ऊस, केळी, हळद या नगदी पिकांच्या लागवडीविषयी तज्ज्ञांचे मार्गदर्शनही मिळणार आहे. द्राक्ष, डाळिंब निर्यातीबाबत मागर्दर्शन होणार आहे. सांगली, सोलापूर, कर्नाटकचा सीमाभाग, कोल्हापूर, सातारा, कऱ्हाड जिल्ह्यांतील शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

  Contact Us
  Dailyagronews.com.

Botawala Chambers , Fort-Mumbai

Tel : + (91) - 8484924178
Mail : support@dailyagronews.com
Business Hours : 9:30 - 5:30

  About

Dailyagronews is a dedicated platform for Exclusive Agriculture News , Now stay in touch with latest happenings in Agriculture . This site is a work of team of technocrafts wanted to help the farming community by contributing something helpful to them. Join this unique platform by contributing the agro news , we will be happy to make it viral