support@dailyagronews.com      +91-8484924178

शेतमालाच्या ऑनलाइन व्‍यवहाराला प्रोत्साहन देण्यासाठी पुरस्कार 

शेतमालाच्या ऑनलाइन व्‍यवहाराला प्रोत्साहन देण्यासाठी पुरस्कार 
By: Agro11 Posted On: February 12, 2020 View: 10

शेतमालाच्या ऑनलाइन व्‍यवहाराला प्रोत्साहन देण्यासाठी पुरस्कार 

पुणेः बाजार समित्यांमधील शेतमाल खरेदी विक्री व्यवहारात पारदर्शकता आणत, ऑनलाइन व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी ऑनलाइन व्यवहारांतून सर्वाधिक पेमेंट केलेल्या आणि घेतलेल्या आडतदार, व्यापारी आणि शेतकऱ्यांना पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. यासाठीची योजना राज्य कृषी पणन मंडळाद्वारे तयार करण्यात येत असून, यावर्षीपासून विभागनिहाय हे पुरस्कार देण्याचे नियोजन आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक होत असल्याच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. यामुळे केंद्र आणि राज्य सरकारकडून बाजार समित्यांमधील व्यवहार पारदर्शी करण्यासाठी विविध कायदे आणि उपाययोजना केल्या जात आहे. तसेच शेतमाल विक्री व्यवहारातील पैशांची देवाणघेवाण ऑनलाइन करण्यासाठी देखील शासन प्रयत्नशील आहे. ऑनलाइन व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी बाजार समित्यांमधील आडते, व्यापारी आणि शेतकऱ्यासाठी पुरस्काराची योजना पणन मंडळ आखत आहे. यामध्ये सर्वाधिक ऑनलाइन पेमेंट करणाऱ्या आडतदार, व्यापारी आणि शेतकऱ्यांना विभागनिहाय पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. या योजनेच्या प्रस्तावाला पणन मंडळाच्या बैठकीमध्ये मंजुरी मिळाल्यानंतर यावर्षी हे पुरस्कार दिले जाणार आहेत. 

#RingRoad रिंगरोडमधून मेट्रो शक्य

असे असतील पुरस्कार 
राज्यस्तरीय आणि विभागीय पातळीवरील पुरस्कार देण्यात येतील. राज्य पातळीवर आडते, व्यापारी आणि शेतकरी पुरस्कार हे साधारण ५१ हजार रुपये रोख, मानचिन्ह आणि विभागीय पातळीवर २५ हजार रुपये रोख आणि मानचिन्ह असे स्वरूप असणार आहे. 

ऑनलाइन व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी सहकार पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांनी नवीन उपक्रम राबविण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यानुसार बाजार समित्यांमधील व्यवहारांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी आर्थिक वर्षात सर्वाधिक ऑनलाइन पेमेंट केलेले आडते, व्यापारी आणि सर्वाधिक ऑनलाइन पेमेंट स्वीकारणाऱ्या शेतकऱ्यांना पुरस्कार द्यायचे विचाराधीन आहे. याचा प्रस्ताव मंडळाच्या बैठकीत मान्यतेसाठी ठेवला जाईल. 
- सुनील पवार, कार्यकारी संचालक, राज्य कृषी पणन मंडळ 

  Contact Us
  Dailyagronews.com.

Botawala Chambers , Fort-Mumbai

Tel : + (91) - 8484924178
Mail : support@dailyagronews.com
Business Hours : 9:30 - 5:30

  About

Dailyagronews is a dedicated platform for Exclusive Agriculture News , Now stay in touch with latest happenings in Agriculture . This site is a work of team of technocrafts wanted to help the farming community by contributing something helpful to them. Join this unique platform by contributing the agro news , we will be happy to make it viral