support@dailyagronews.com      +91-8484924178

साठवणूक हळद बेण्याची...

साठवणूक हळद बेण्याची...
By: Agro_spices Posted On: April 13, 2020 View: 200

साठवणूक हळद बेण्याची...

निवडलेले बेणे जातिवंत आणि चांगले असेल तर उत्पादन देखील चांगले मिळते. बेणे निवड करताना रोग,कीडग्रस्त किंवा अर्धवट कुजलेले गड्डे साठवणुकीमध्ये येणार नाहीत याची काळजी घ्यावी. यांपैकी जेठा गड्डे,बगल गड्डे आणि हळकुंडे लागवडीसाठी बेणे म्हणून वापरावे.

सध्या हळद काढणीचा हंगाम सुरू आहे. खांदणी करून काढलेले कंद २ ते ३ दिवस सूर्यप्रकाशात चांगले तापू दयावेत.त्यामुळे कंदास चिकटलेली माती पूर्णपणे निघण्यास मदत होते.त्यानंतर २ दिवसांनी हळद कंदाची मोडणी करावी. हळद कंदाचा गड्डा हळूच आपटला असता गड्याला चिकटलेली माती वेगळी होण्यास मदत होते.त्यावेळी जेठा गड्डे, बगल गड्डे, सोरा गड्डे, हळकुंडे आणि याव्यतिरिक्त रोग व कीडग्रस्त हळकुंडे अशा उत्पादित हळदीची प्रतवारी करावी. त्यानुसार त्यांची वेगवेगळ्या ठिकाणी साठवणूक करावी. बेणे निवड करताना रोग,कीडग्रस्त किंवा अर्धवट कुजलेले गड्डे साठवणुकीमध्ये येणार नाहीत याची काळजी घ्यावी. यांपैकी जेठा गड्डे,बगल गड्डे आणि हळकुंडे लागवडीसाठी बेणे म्हणून वापरावे.

जेठागड्डा

 • मुख्य रोपाच्या खाली वाढणाऱ्या कंदास जेठागड्डा किंवा मातृकंद म्हणतात. प्रामुख्याने पुढील वर्षी लागवडीसाठी बेणे हे मातृकंदाचे ठेवावे.
 • हळद कंदापासून मातृकंद वेगळे करावेत.सशक्त, निरोगी, जाड मातृकंद गड्डे बेणे म्हणून निवडावेत.
 • बेण्यासाठी निवडलेल्या मातृकंदाचे वजन ५० ग्रॅम पेक्षा जास्त असावे. आकार त्रिकोणाकृती असावा.
 • काढणीनंतर हे गड्डे ताबडतोब सावलीमध्ये ठेवावेत.

बगल गड्डे

 • जेठे गड्याला आलेला फुटव्यांच्या खाली येणाऱ्या गड्याला बगल गड्डे असे म्हणतात. त्यास अंगठा गड्डे असेही म्हणतात.
 • ४० ग्रॅम पेक्षा जास्त वजन असणाऱ्या गड्ड्यांचा वापर बेणे म्हणून करतात.

हळकुंडे

 • बगल गड्यांना आलेल्या कंदास हळकुंडे म्हणतात. हळकुंडे देखील बेण्यासाठी वापरली जातात.
 • मातृकंद कमी पडत असतील तर हळकुंडे बेणे म्हणून वापरावे.
 • बेण्यासाठी निवडलेल्या हळकुंडांचे वजन ३० ग्रॅम पेक्षा जास्त असावे.
 • निवडलेली हळकुंडे ठळक, लांब, जाड, ठसठशीत वाढलेली, निरोगी आणि एकसमान आकाराची भेसळमुक्त असावीत.

सोरा गड्डा

 • लागवडीच्या वेळेस वापरलेले जेठा गड्डे (मातृकंद) हळद पिकाच्या नऊ महिने वाढीच्या कालावधीत ५० ते ६० टक्के कुजून जातात. राहिलेले ४० ते ५० टक्के कंदाना सोरागड्डे म्हणतात.
 • सोरा गड्डे हे दिसायला काळपट रंगाचे तसेच मुळ्या विरहीत असतात.
 • बेणे म्हणून सोरागड्डे वापरता येत नाहीत.

बेण्याची साठवणूक

 • निवडलेले हळद बेणे त्वरित झाडाखाली सावली असलेल्या थंड ठिकाणी ढीग करून साठवावे. बेण्याचा ढीग करताना हवा खेळती राहील याची काळजी घ्यावी, अन्यथा बेण्याच्या उगवणीवर परिणाम होवू शकतो. बेण्याचा ढीग करताना थोडासा उंचवटा करून कोन पद्धतीने ढीग करून रचावेत.
 • बेण्याच्या ढिगावर हळदीच्या वाळलेल्या पानांचा १० ते १५ सें.मी. जाडीचा थर द्यावा. जास्त तापमान असलेल्या ठिकाणी हळदीच्या
 • वाळलेल्या पाल्यावर गोणपाट टाकावे, केवळ गोणपाट भिजेल एवढेच पाणी फवारावे.
 • साधारणतः: दोन ते अडीच महिन्याच्या कालावधीपर्यंत बेणे सुप्तावस्थेत रहाते. या कालावधीत केवळ बेण्याच्या अंतर्गत बदल अथवा शरीरक्रिया घडून येत असतात.कोणत्याही स्वरूपात बाह्य बदल दिसून येत नाही.सुप्तावस्था संपेपर्यंत बेण्यावर पाणी शिंपडू नये.
 • दोन ते अडीच महिन्याच्या कालावधीत बेण्यांची सुप्तावस्था पूर्ण होते. सुप्तावस्था संपल्यानंतर बेण्यामध्ये बदल दिसून यायला सुरुवात होते.यावेळी बेण्यावरील डोळे फुगीर होतात. डोळे फुटण्यास प्रारंभ होतो. त्यानंतर मात्र बेणे परत निवडावेत, बेण्यावरील मुळ्या काढाव्यात, पानांचे शिल्लक राहिलेले अवशेष काढावेत आणि मुळ्या विरहीत रसरशीत निरोगी बेणे लागवडीसाठी वापरावेत.
 • लागवड करण्यास थोडाफार अवधी असेल तर दिवसातून दोन वेळेस बेण्यांच्या ढिगावर पाणी शिंपडावे.पाणी शिंपडल्यामुळे बेण्याची एकसारखी उगवण होण्यास मदत होते. सूर्यप्रकाश, वारा यांचा बेण्याशी प्रत्यक्ष संपर्क येणार नाही याची काळजी घ्यावी.

संपर्क - डॉ.मनोज माळी, ९४०३७ ७३६१४
(प्रभारी अधिकारी, हळद संशोधन योजना, कसबे डिग्रज,जि.सांगली)

  Contact Us
  Dailyagronews.com.

Botawala Chambers , Fort-Mumbai

Tel : + (91) - 8484924178
Mail : support@dailyagronews.com
Business Hours : 9:30 - 5:30

  About

Dailyagronews is a dedicated platform for Exclusive Agriculture News , Now stay in touch with latest happenings in Agriculture . This site is a work of team of technocrafts wanted to help the farming community by contributing something helpful to them. Join this unique platform by contributing the agro news , we will be happy to make it viral